PG Medical entrance test : एम्स पीजी वैद्यकीय प्रवेश परीक्षा एक महिन्यांनंतर घ्या, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

PG Medical entrance test : AIIMS PG अभ्यासक्रमांसाठी होणारी इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स कंबाइंड एन्ट्रन्स टेस्ट (Institute of National Importance Combined Entrance Test, INICET 2021)एक महिन्याने करावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही परीक्षा लांबणीवर टाकावी, या मागणीसाठी डॉक्टरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या परीक्षेसाठी सुमारे ८० हजार डॉक्टरांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. १६ जून रोजी परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

न्यायमूर्ती इंदिरा बनर्जी आणि एम आर शाह यांच्या पीठाने याचिकेवर हे निर्देश दिले. याचिकेमध्ये १६ जून तारीख ठरवणाऱ्या अधिसूचनेला आव्हान देण्यात आले होते. परीक्षेमुळे उमेदवारांना होणारा त्रास आणि करोना ड्यूटीमुळे डॉक्टर परीक्षा केंद्रांपासून दूर असल्या कारणाने परीक्षा पुढे ढकलण्याची गरज असल्याचे पीठाने म्हटले.

कोविड ड्युटीमुळे या परीक्षेची तयारी, उजळणी करण्यासाठी अनेक उमेदवारांना वेळ मिळाला नसल्याचे या डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरी पदव्युत्तर पदवी वैद्यकीय परीक्षा NEET PG परीक्षा ऑक्टोबर महिन्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे.

INI CET 2021 परीक्षा याआधी ८ मे २०२१ रोजी होणार होती. नंतर कोरोना प्रादुर्भावामुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS)ने करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे विविध अभ्यासक्रमांची व्यावसायिक परीक्षा आणि प्रवेश परीक्षा पुढे ढकलली.

Leave a Comment

%d bloggers like this: